तुझे प्रेम माये असे सर्व माझे ।।
- चंद्रहास 
न लागे तुला सांगणे रेणुकांबे
हिता जाणते तू सुताच्या सदा हो ।
तुझे लक्ष माझ्याकडे नित्य राहो
मला पामराला तुझी ओढ लागो ।।
भ्रमे विभ्रमे चित्त माझे तरीही
क्षमा तू करीशी समीपे बसोनी।
मला सांगते तू हिताच्या प्रयुक्ती
कधी दिव्य गोष्टी शिवे तू हसोनी।।
जगी तू वरिष्ठा तथा वत्सला तू
तुझे प्रेम माये असे सर्व माझे ।
सदा सोबती तू कृपाकारिणी तू
तुझे प्रेम माये असे सर्व माझे ।।

Comments

Popular posts from this blog

वै. श्रीगुरू श्री. भगवानशास्त्रीमहाराज सोनपेठकरः संक्षिप्त चरित्र